मी आहे म्हणणाऱ्याला आहे, नाही म्हणणाऱ्याला नाही

-श्री संत बाळूमामा

पृथ्वी जन्मा - मी आधीपासून
पेटती झाडे अंतीचा क्षण |
मामा सांगती भक्ताची खूण
करितो संकटी भक्त रक्षण ||

तत्कालीन मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अकोळ गाव आहे. या गावातील मायाप्पा आणि सत्तू बाई या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. हा दिवस सोमवार आश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४( ३ ऑक्टोबर १९८९२) हा होता. बाळूमामांचे बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्याला जैन सावकाराकडे चाकरीस ठेवले. जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहिण गंगुबाई हिऱ्याप्पा खिलारी हिच्याकडे राहू लागले. भाचे मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्यांचे मामा व जगाचे बाळूमामा झाले.

उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केले. त्यांनी वाचा सिद्धीचा व लोकसंग्रहाचा आशीर्वाद दिला. बाळूच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगुबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले आणि फिरता संसार सुरू झाला.

बाळूमामांचे बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्याला जैन सावकाराकडे चाकरीस ठेवले. जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहिण गंगुबाई हिऱ्याप्पा खिलारी हिच्याकडे राहू लागले. भाचे मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्यांचे मामा व जगाचे बाळूमामा झाले.

उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केले. त्यांनी वाचा सिद्धीचा व लोकसंग्रहाचा आशीर्वाद दिला. बाळूच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगुबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले आणि फिरता संसार सुरू झाला.

लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली पण बाळुमामाची अज्ञान न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला ते बकऱ्यांचा कळप गावोगावी महाराष्ट्र व कर्नाटकात घेऊन जात असत. कीर्ती किंवा प्रसिद्धीची त्यांना हाव आपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी बोलीभाषेत ते सर्वांना न्याय नीती व धर्म चरणाचा उपदेश करत असत.

प्रसंगी शिव्या देत असत त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्या असत. लहानांपासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, आडाण्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व थरातील स्त्री-पुरुष त्यांचे भक्त होते. शर्ट धोतर फेटा कांबळा हा त्यांचा पेहराव तर भाजी-भाकरीचा आहार! असो ऊन, वारा, पाऊस बकर्‍या सवे शिवारातच त्यांचा निवास. गोरगरिबांना अन्नदान व्हावे ते भक्तिमार्गाला लागावी म्हणून त्यांनी १९३२ सालापासून भंडारा उत्सव चालू केला तो सध्या ही चालू आहे


दैनदिन कार्यक्रम

  • पहाटे ४.०० वा. - षोड:शोपचार पूजा
  • पहाटे ५.०० वा. - आरती
  • सकाळी - भोजनाचा नैवैद्य
  • संध्याकाळची ७ वा. - आरती
  • रात्री - नैवैद्य
  • प्रासंगिक - प्रवचन, कीर्तन, भजन

बाळूमामा सेवा योजना


श्री बाळूमामा देवालय आदमापूर येथे सन २०२३ मध्ये साजरे होणारे कार्यक्रम



दैनंदिन नित्य पूजा